वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक

मंगळवार, 27 मे 2025 (10:37 IST)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकाचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील सह पाच जणांना अटक केली आहे. प्रीतम पाटील याने फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांना मदत केल्याचा आरोप आहे.
ALSO READ: वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगावर प्रश्न उपस्थित करत टीका
आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी पाटील यांच्याकडे आश्रय घेतल्याचे समोर उघडकीस आले आहे. पिंपरी पोलिसांनी सोमवारी 26 मे रोजी ही कारवाई केली आहे. 
या प्रकरणी पोलिसांनी प्रीतम वीरकुमार पाटील, बंडू उत्तम भेगडे,बंडू लक्ष्मण फटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव यांना अटक केली आहे. 
ALSO READ: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अजित पवार म्हणाले
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरनंतर वैष्णवीची सासू लता हगवणे, पती शशांक ,नणंद करिश्माला पोलिसांनी अटक केली तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. त्यांना सात दिवसानंतर स्वारगेट येथून अटक केली. दरम्यान त्यांनी वडगाव मावळ, लोणावळा, सातारा,महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 
आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. वीरकुमार पाटील 28 वर्ष काँग्रेसचे आमदार होते. ते ऊर्जामंत्री देखील होते. 
Edited By - Priya Dixit    
ALSO READ: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासऱ्या आणि दिराला 5 दिवसांची पोलीस कोठडी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती