वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासऱ्या आणि दिराला 5 दिवसांची पोलीस कोठडी

शनिवार, 24 मे 2025 (11:04 IST)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार झालेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना काल स्वारगेट येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपी सासरे आणि दिराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
ALSO READ: वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक
आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजप महिला आघाडीने निर्दर्शन करत आरोपींवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र हगवणे यांच्या बॅनरला चपलेने मारत हेच मारेकरी आहे अशा घोषणा दिल्या. 
ALSO READ: वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांची मोठी कारवाई, राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
कोर्ट परिसरात भाजप महिला आघाडीच्या नेत्या हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी दुपारी धडक देत हगवणे पिता पुत्राच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी त्यांच्यावर महिलांनी टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न केला.आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: ५१ तोळे सोने, आलिशान गाडी आणि भव्य लग्न, राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू बनला चर्चेचा विषय

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती