वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक

शुक्रवार, 23 मे 2025 (10:35 IST)
rajendra sonavane facebook
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेल्या वैष्णवीच्या सासरान्या आणि दीर सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे स्वारगेट येथून पोलिसांनी अटक केली आहे. 
ALSO READ: पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचे बाळ त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले
अटकेपूर्वी ते दोघे तळेगावात एका भोजनालयात जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी आहे.  

राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हिने 16 मे रोजी सासरच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून पुण्यातील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
ALSO READ: वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवार यांची मोठी कारवाई, राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी
या प्रकरणी वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली. मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. 

आज शुक्रवारी सकाळी पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटकेपूर्वी त्यांना तळेगावात एका भोजनालयात जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या मुळेच पोलिसांना त्यांचे ठिकाण मिळाले 
ALSO READ: धुळ्यातील "रोख घोटाळ्यावर कारवाई करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी हुंड्यात दिली असून तिच्या सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवला. पती तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, किरकोळ कारणांवरून वाद करणे, पैशाची मागणी करणे हे सर्व प्रकार सुरु होते. वैष्णवीच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळल्या.

पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात दखल घेत राजेंद्र हगवणे यांच्यावर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती