घडलेली घटना दुर्देवी असून रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे असले तरी रुग्णालयाकडून मयत रुग्णाच्या प्रति संवेदनशीलता दाखवण्यात आली आहे की नाही याचा तपास आम्ही करत आहो. झालेल्या घटनेबद्दल सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलय परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, कालच्या घडलेल्या घटनेने आम्ही या पुढे कोणत्याही रुग्णाकडून मग तो प्रसूती विभागाचा असो की लहान मुलांच्या विभागात असणारा रुग्ण असो.त्यांच्याकडून इमर्जन्सी डिपॉझिट रक्कम घेणार नाही. असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे.