गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचा निश्चित चांगला उपयोग होणार असून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.
ॲपची वैशिष्ट्ये
* ताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ॲपद्वारे साध्या क्लिकद्वारे करू शकतो.