सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात आणि त्यासाठी ते मर्यादा देखील ओलांडतात. काही लोक वाहनावर स्टंट करतात तर काही अश्लील कृत्य करतात. असाच एक व्हिडीओ पुण्यातून व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये एक जोडपे चालत्या वाहनावर रोमान्स करत आहे.
व्हायरल व्हिडीओ पुण्यातील शिंदेवाडी परिसरातील खेड शिवापूर भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील आहे. या व्हिडीओ मध्ये एक तरुण आणि तरुणी बाईकवर चालत आहे आणि ती तरुणी गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे.तिने दुपट्ट्याने चेहरा झाकला आहे. दोघेही एकमेकांशी बोलतात आणि काही क्षणातच दोघेही एकमेकांना मिठी मारू लागतात.
रस्त्यावरून चालणाऱ्या काही लोकांनी त्यांचे हे कृत्य आपल्या मोबाइल फोन मध्ये रेकॉर्ड केले आहे. लोक व्हिडीओ करत असल्याची पर्वा न करता हे जोडपे रोमान्स करत होते.
पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही लोक हे अश्लील आहे असे म्हणत आहेत, तर काही लोक हे धोकादायक गाडी चालवणे असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.