विरोधक बबलू गवळीला संपवण्यासाठी पुण्यातील भाजप नगरसेवकाने दिली होती सुपारी

मंगळवार, 20 जुलै 2021 (08:06 IST)
पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाने विरोधक गुंडाला संपवण्यासाठी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली होती.परंतु हक्क पूर्ण होण्याआधीच पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी खुनाची सुपारी घेणाऱ्या सराईत गुंडांना अटक केली.त्यांच्या ताब्यातून तीने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली.
 
राजन जॉन राजमनी आणि त्याचा मित्र इब्राहीम उर्फ हुसेन याकुब शेख अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहे. पुण्यातील कँटॉंन्मेंटचे माजी नगरसेवक विवेक यादव यांनी त्यांना खून करण्यासाठी सुपारी दिली होती. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की,माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यावर 2016 साली माणसातून गणपती विसर्जन मिरवणुकीत गोळीबार झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव यांनी कारागृहातून सुटलेल्या सराईत यना बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती.
 
दरम्यान कोंढवा पोलिसांना या कटाची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचून वरील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.या प्रकरणात माजी नगरसेवक विवेक यादव यांचा थेट संबंध असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले.नाटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी तीन पिस्तुले, रोख दीड लाख आणि जिवंत काडतुसे जप्त केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती