पुण्यात शनिवारी 283 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची तर 268 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पालिका हद्दीत 11 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 680 इतकी झाली आहे. शहरात 229 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3042 झाली आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 83 हजार 199 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 71 हजार 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात एकाच दिवसात 7 हजार 950 नमुने घेण्यात आले आहेत.