Bajrang Sonawane Car Accident : बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या कारला अपघात, सुदैवाने बचावले

बुधवार, 5 जून 2024 (09:46 IST)
बीड लोकसभा मतदार संघाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या कार ला अपघात झाला असून त्यात ते सुदैवाने बचावले आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ताफ्यातील एक वाहन त्यांच्या कारला येऊन पाठीमागून धडकले. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

सदर घटना धुळे-सोलापूर महामार्गावर घडली. सुदैवाने या अपघातात बजरंग सोनावणे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 
 
काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून बजरंग सोनावणे हे बीड मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उभे होते त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
रात्री उशिरा ते मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी जालना गेले होते. परत येताना ताफ्यातील एक वाहन त्यांच्या कारला येऊन धडकले.या अपघातात ते सुदैवाने बचावले असून त्यांचे कार्यकर्त्या किरकोळ जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मी सुखरूप असून मला कोटीही इजा झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती