महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची बीड येथे आज सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, बीडचे पालक मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोलंकी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, बीड जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, इंडिया आघाडीतील चारा घोटाळ्यातील नेते लालू प्रसाद यादव यांनी नमूद केले आहे की दलित, मागासवर्गीय, आदिवासींचे आरक्षण काढून मुसलमानांना देण्यात येईल. परंतु जो पर्यंत मोदी जिवंत आहे तो पर्यंत कोणीही दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोकांचे आरक्षण रद्द करू शकणार नाही. आज बाळासाहेबांची खरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप सोबत आहे. तर नकली शिवसेना ही काँग्रेस पक्षासोबत आहे.