मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह येणार पुण्यात

बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (10:48 IST)
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच महापालिकेच्या एका कामासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
 
पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन तर नव्या इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्याचं नियोजन सत्ताधारी भाजपने केलं आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती