काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने पुरंदरे यांना दुखापत झाली होती. त्यांना न्यूमोनियाची लागण लागल्यामुळे प्रकृती चिंताजनक होती. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योती मालवली. साडे आठ वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे.