पुण्यात घरीच अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळाला उंचावरून फेकले

सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (15:05 IST)
पुण्याच्या कोंडवे धावडे भागात एका अल्पवयीन मुलीची यू ट्यूब वर व्हिडीओ पाहून घरीच प्रसूती करून नवजात बाळाला उंचावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय एका अल्पवयीन मुलीने यु ट्यूब वर बघून घरीच स्वतःची प्रसूती केली नंतर बाळाला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. कोंढवे धावडे परिसरातील ही घटना आहे. 

अल्पवयीन मुलगी या भागात आपल्या आईसह राहते. मुलीने पोट दुखल्याची तक्रार केल्यावर आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची शक्यता वर्तवत त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितले. पण त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. हळू हळू तिचे पोट दिसू लागले तेव्हा शेजाऱ्यांनी विचारपूस केल्यावर तिच्या पिशवीला सूज आल्यामुळे पोट दुखत असल्याचे सांगितले नंतर तिनेच यु ट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वतःची प्रसूती घरीच केली आणि बाळाला सोसायटीच्या आवारात असलेल्या पार्किंग मध्ये दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. काही रहिवाशांना हे बाळ आढळले त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांना एका मुलीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यांनी या मुलीची कसून चौकशी केल्यावर तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्यावर गुन्हा दखल केला असून बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

Edited By - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती