पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट जगवण्यावर जाणवण्याची शक्यता आहे. खरंतर येत्या 20 ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा संप 11 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलाय. 1 नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलाय.