पुण्यात शाळेच्या व्हॅनवर आणि दुचाकीवर मोठे झाड कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

शुक्रवार, 26 जुलै 2024 (15:17 IST)
Photo - Twitter
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहे.  
वडगाव शेरी येथे आनंद पार्क आज सकाळी शाळेच्या व्हॅनवर आणि रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या अंगावर एक मोठे झाड कोसळले, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, दोन वाहनांचे नुकसान झाले.या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे आनंद पार्क जवळ आज सकाळी शाळेच्या व्हॅन वर आणि दुचाकीवर भलेमोठे झाड कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 

दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. तसेच पिंपरी -चिंचवड भागातील कार्यालये व इतर आस्थापनां सुट्टी देण्यात आली आहे. 

भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तासांत घाट परिसरात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यात मैदानी भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
Edited By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती