पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात महापालिका कार्यक्षेत्रात डेंग्यूचे 63 रुग्ण आढळले आहे. तर झिका आजाराचे 3 रुग्ण आणि चिकुनगुन्याचे 8 रुग्ण आढळले आहे. सध्या सर्वत्र पावसाचा जोर असून पावसाळ्यात डेंग्यूच्या आजाराचे प्रकरण वाढत असून पावसाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागामार्फ़त करत आहे. डेंग्यूचे वाढते प्रकरण पाहता या आजाराच्या प्रतिबंधाकामी पिंपरी चिंचवड महापालिकेने डेंग्यू मोहिमेची सुरुवात केली.
महापालिकेच्या परिसरात डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका आजाराचे रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गर्भवती महिलांना झिका व डेंग्यूची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच ताप, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.