पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बस मध्ये अत्याचार

बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (14:16 IST)
पुण्यात स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरात उभी असलेल्या शिवशाही बस मध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. 
ALSO READ: पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी मारली
पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करताना स्वारगेट एसटी बस स्टॅन्ड वर बस थांबल्यानन्तर एक अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले. तरुणीला त्यावर विश्वास बसेना. नंतर आरोपीने तिला एकटी पाहून तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या बंद असलेल्या शिवशाही बस कडे घेऊन गेला नंतर त्याने तिला बंद बस मध्ये जाण्यास सांगितले.नंतर स्वतः बस मध्ये शिरला आणि तिच्यावर बलात्कार करून तिथून पसार झाला. 
ALSO READ: पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान संपन्न
नंतर तरुणीने आपल्या मित्राला घडलेले सांगितले. मित्राने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. नंतर तिने स्वारगेट पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञाताच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. 
ALSO READ: पुण्यात शिवसेना यूबीटी कार्यकर्त्यांनी कर्नाटक नंबर प्लेट असलेल्या बसेसवर काळे फासले
पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला शोधण्याची मोहीम सुरु केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून त्याला ओळखले असून लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती