२ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार सीबीएसईचे संपूर्ण वेळापत्रक

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:05 IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार आहेत. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. तसेच  गुरुवारी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती दिली.
 
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन वेबिनार झाला असताना  यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली.
 
निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार असून १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. १५ जुलै २०२१ पर्यंत सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 
सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्ड आपलं अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक अपलोड करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती