मनात एखादी इच्छा धरुन निश्चय करुन श्री गोरक्ष किमयागिरी ग्रंथ पठण केल्यास मनोकामना पूर्ण होते. ग्रंथ पठन करण्यासाठी पूर्वींकडे मुख करून एखाद्या मऊ वस्त्राच्या आसनावर बसावे. ग्रंथ पठण करण्यासाठी लाकडी पाट बसावयास घेऊ नये. पाटवर बसायचे असल्यास त्यावर वस्त्र घालून त्यावर बसावे. समोर चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर ग्रंथ ठेवावा. दररोजची पूजा करून नित्य वाचन करावे. समोर किंवा उजव्या हाताला श्रीदत्तात्रेययांची तसबीर असावी. फोटो खाली जमिनीवर न ठेवता भिंतीस टांगावा. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आरंभ करून रोज रात्री एकदा संपूर्णं ग्रंथ वाचून आरती करावी. या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होण्यास अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागतो. तेवढी सवड काढून नित्य ग्रंथपठण करुन, नाथांचा ससाद भाविक जनांनी मिळवावा, हीच श्रीदत्तचरणी प्रार्थना.