वसुबारसला गाई-वासराचे पूजन कसे करावे? संपूर्ण विधी आणि कथा जाणून घ्या
शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 (06:24 IST)
वसुबारसला गाई-वासराचे पूजन करण्यासाठी, संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराला स्वच्छ करून हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. नंतर त्यांना गोड पदार्थ खाऊ घाला आणि ओवाळून, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. या दिवशी घरामध्ये समृद्धी आणि शांती नांदण्यासाठी प्रार्थना केली जाते.
वसूबारस पूजन विधी-
वसुबारसच्या दिवशी संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर (प्रदोषकाळात) पूजा केली जाते.
अंगणात सुंदर रांगोळी काढा.
प्रथम गाय आणि वासरू यांना स्वच्छ करा आणि त्यांना व्यवस्थित जागा द्या.
गाय आणि वासराच्या पायांवर पाणी वाहून त्यांना हळद-कुंकू लावा.
त्यांना फुलांच्या माळा घाला आणि अक्षता वाहा.
गाय आणि वासराला निरंजनाने ओवाळा आणि त्यांच्या अंगाला स्पर्श करा.
त्यांना नैवेद्य दाखवा. पुरणपोळी, गुळाचे लाडू, चुरमा, गोड भात अर्पण करावा. ताजी गवताची जुडी देखील नैवेद्य म्हणून अर्पण करावी.
घरामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य नांदण्यासाठी प्रार्थना करा.
वसुबारसला गाई-वासरू नसल्यास, तुम्ही गाईची मूर्ती, चित्र किंवा फोटो वापरून पूजा करू शकता, ज्याला कामधेनू पूजा म्हणतात. पूजेमध्ये गाईला आणि वासराला नैवेद्य म्हणून गोडधोड, दूध, तूप, ताक आणि उडदाचे वडे खाऊ घालतात. पूजा संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर करतात आणि घरात लक्ष्मी येण्यासाठी ही पूजा केली जाते.
या दिवशी काय करु नये
या दिवशी तेलात तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत.
या दिवशी गहू आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले जाते.
आरती
धेनू माय जगत जननी, लोकत्रय त्रिताप शमनी।
अखिल जगतास मोक्ष दानी, जिचे नि सालकृंत अवनी
निगमागम जिला गाती
निगमागम जिला गाती
वंदीती सुरवर मुनिजन। पुनित पतित जन। घेता दर्शन।
प्रियकर शिव सांबा, सुरभि सौख्यद जगदंबा ।।1।।
गोमुत्रात वसे गंगा, कमला गोमयात रंगा।
अखिल देवता जिचे अंगा, सदाजी प्रियकर श्रीरंगा।
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
जियेचे नेत्र सूर्यचंद्र
पहा उपेंद्र गोकुळी। कृष्णवाळ अवतार नखाग्री। गोवर्धन धरुनी।