अभ्यासासोबत फिटनेसकडेही लक्ष देणे गरजेचे

WD
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा तणाव वाढणे स्वाभाविक आहे. या काळात शारीरिक आणि मानसिक दबाव जास्त असतो. अभ्यास करताना अर्थवट झोप घेणे आणि खाण्यापिण्यात बेफिकीरपणा आरोग्यासाठी चांगला नाही. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर घसरून आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

पुरेशा झोप घ्या अभ्यास करण्यासाठी फार उशिरापर्यंत जागरण करण्याची चूक करू नये. अ शामुळे मेंदूला एकाग्र करण्यात अडचणी येतात. अशाने परीक्षेवेळी विद्यार्थी अभ्यासलेल्या गोष्टी विसरून जातो. यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना आपली झोपेची वेळ प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी.

योग्य आहार - स्मरणशक्ती वाढरे, मेंदूला ऊर्जा पुरवठा होणे आणि इतर प्रणालीचे काम योग्य पद्धतीने चालण्यासाठी आहारात पोषक तत्त्वाची भूमिका फार महत्त्वाची असते. य काळात पुरेशा हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे.

तणाव घेऊ नये - अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा मिनिटांचे मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे मानसिकरित्या तुम्ही रिलॅक्स होऊ शकाल.

वेबदुनिया वर वाचा