मुशर्रफ यांच्या पाडावानंतर पक्षांमधील मतभेद तीव्र

बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (16:27 IST)
राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सत्तेवर हटवण्यासाठी परस्परांचे कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज गट) यांच्यातील मतभेत आता तीव्र झाले आहेत.

केवळ मुशर्रफ यांना पायउतार करण्यासाठी 1990 पर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या या पक्षांनी पाकमधील निवडणुकांनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

यानंतर निलंबित न्यायाधीशांच्या प्रश्नावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाजले होते, परंतु कालांतराने मुशर्रफ यांनी आपली ताकद वाढवण्याचा पुन्हा प्रयत्न केल्याने या उभय पक्षांनी पुन्हा एकत्र येत मुशर्रफ यांच्या विरोधात मुसंडी मारली होती.

आता मुशर्रफ पाडाव हे एकमेव उद्दिष्ट पूर्णं झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद निर्माण झाले असून, निलंबित न्यायाधीशांच्या पुर्नबहालीच्या मुद्द्यावरून आयोजीत संयुक्त बैठकीत हे वाद चव्हाट्यावर आले.

वेबदुनिया वर वाचा