Oscar Nominations 2023 : RRRने इतिहास रचला, 'नाटू-नाटू' हे गाणे ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत ऑस्करसाठी नामांकित

Webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2023 (19:38 IST)
ऑस्कर 2023 साठीच्या नामांकनांची मंगळवारी (24 जानेवारी) कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथे अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स यांनी त्यांच्या अकादमी पुरस्कार नामांकनांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या नामांकनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भारतासाठी ही आनंदाची बातमी आली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, RRR आता ऑस्कर 2023 साठी देखील अधिकृतपणे नामांकित झाले आहे. चित्रपटातील नातू नातू या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख