Samsung Galaxy On8 चा भारतात पहिला सेल जाहीर

सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (17:06 IST)
सॅमसंग कंपनीतर्फे Samsung Galaxy On8 चा भारतातील पहिला सेल जाहीर करण्यात आला आहे. हा सेल www.flipkart.com आणि सॅमसंगची अधिकृत वेबसाईट असलेल्या https://shop.samsung.com/in यावर १२ वाजल्यापासून सुरु होईल. या सेलमध्ये कंपनीने Samsung Galaxy On8 वर १ हजार रुपयांची सूट दिली आहे. हा फोन १६,९९९ रुपयांना असून सूट मिळाल्यानंतर तो १५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.
 
याबरोबरच हा मोबाईल शून्य व्याजदर असलेल्या ईएमआयवर खरेदी करता येईल असे सांगण्यात आले आहे. तसेच जिओच्या ग्राहकांना या मोबाईलच्या खरेदीवर २७५० रुपयांची कॅशबॅक देण्यात येईल. याशिवाय डबल डेटा ऑफरही देण्यात येईल. फ्लिपकार्टवरुन हा फोन अॅक्सिस बँकेच्या क्रेडिटकार्डद्वारे खरेदी केल्यास ४०० रुपयांची आणखी कॅशबॅक ऑफर मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती