गुरुवारी एका पोलिस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भूतान आर्मीचे कॉन्स्टेबल शिवंग गेलसन हे 7 मे रोजी कॅम्पसमध्ये असलेल्या 'आर्मी म्युझिक विंग'मध्ये आले होते. ते पाच महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथे आले होते. या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "बुधवारी दुपारी अडीच वाजता जेवण केल्यानंतर गेलसन तलावाकडे गेला. येथे तो घसरला आणि त्यात बुडाला. गेलसनला लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.