अनेक फीचर्स असलेला Galaxy A21s लाँच

बुधवार, 17 जून 2020 (19:36 IST)
सॅमसंगने भारतात नवीन स्मार्टफोन Galaxy A21s लाँच केला आहे.  फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये infinity-O डिस्प्ले असून याद्वारे युजर्सना दर्जेदार व्हिजुअल्सचा अनुभव मिळतो. 
 
हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे. 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत कंपनीने ठेवली आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन  सर्व रिटेल स्टोअर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.
 
या फोनमध्ये 6.5 इंचाचा infinity-O डिस्प्ले असून 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 21 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक सपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट असून AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 दिले आहे. यामुळे गेम खेळताना फ्रेम रेट आणि स्टेबिलिटी सुधारण्यास मदत होते, तसेच बॅटरीचाही कमी वापर केला जातो. फोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज असून 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
 
अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असून फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर्सही फोनमध्ये आहेत. मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती