सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि कोरोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच सोमवारी सोन्याचे दर वाढले होते. पण मंगळवारी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, MCXवरील सोन्याची किंमत दहा ग्रॅमला प्रति 1000 रुपयांनी घसरून 46 हजार रुपयांवर आली आहे. मंगळवारी MCXवरील सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 47,980 रुपयांवरून 46,853 रुपयांवर आले आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक अर्थव्यवस्था कोरोनामुळे मंदीच्या विळख्यात आहे. त्याच वेळी अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकत आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याची खरेदी सुरू केली आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्यातील तेजी वाढू शकते. ते लवकरच 50,000 रुपयांवर जाऊ शकते.