सोने-चांदीच्या किंमतीत वाढ

सोमवार, 1 जून 2020 (16:11 IST)
सोनं दरात सोमवारी वाढीची नोंद झाली. सोन्या-चांदीच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 76 रुपयांच्या वाढीसह 46,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं आहे. MCXवर चांदी 696 रुपयांच्या वाढीसह 50,814 रुपये प्रति किलोवर गेलं आहे.
 
सोन्याचे दर सध्या 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार, 2021 पर्यंत सोन्याचे दर 80 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतात. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज विश्लेषकच्या अंदाजानुसार, 2021च्या शेवटापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारा सोन्याचे दर औंसनुसार ठरतात. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम वजन असतं. त्यामुळे एक ग्रॅम सोन्याची किंमत 8075 रुपये इतकी असते. त्यानुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार 753 रुपये इतकी होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती