एलपीजी सिलिंडर 110 रुपयांनी महाग झाले, 1 जूनपासून नवीन दर लागू

सोमवार, 1 जून 2020 (11:17 IST)
अनलॉक -१ मध्ये सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. 19 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 110 रुपयांनी वाढली आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याच वेळी दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति सिलेंडर 11.50 रुपयांनी महाग झाली आहे. आता आज म्हणजे एक जूनपासून ते 593 रुपयांना उपलब्ध होतील, तर 1 kg किलो सिलिंडरची किंमत 110 रुपये वाढली असून ते आता  1139.50 रुपयांमध्ये मिळणार आहे. 
 
इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार आता दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 581.50 रुपयांवरून 593 रुपये झाली आहे. ते कोलकातामध्ये 616.00 रुपये, मुंबईमध्ये 590.50 रुपये आणि चेन्नई मध्ये 606.50 रुपये झाले जे अनुक्रमे 584.50 रुपये, 579.00 आणि 569.50 रुपये होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती