बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (12:13 IST)
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक साबण असा आहे ज्याची किंमत हजार रुपयांमध्ये नाही तर चक्क लाख रुपयांमध्ये आहे. या साबण्याची किंमत चक्क १ लाख ८० हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 
लेबनान नामक उद्योगसमूह या साबणाची निर्मिती करत असून हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास १०० वर्षापासून या साबणाची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु हा साबण महाग असल्यामुळे याची खरेदी करणारेही फार कमी ग्राहक आहेत.
 
या साबणाची निर्मिती केवळ मागणी असल्यावरच केली जाते. हा साबण तयार करण्यासाठी सोन्याची आणि हिऱ्याची पावडर वापरली जाते. त्यामुळे हा साबण प्रचंड महाग आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती