सोने महागले, दोन आठवड्याचा उच्चांक

बुधवार, 22 जानेवारी 2020 (12:51 IST)
जागतिक बाजारात सोनच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोनच्या किमतीत वाढ झाली असून सोनेदर दोन आठवड्याच उच्चांकावर गेला आहे. मंगळवारी सोनेदरात प्रतिऔंस 0.3 टकके वाढ झाली. सोनचा दर प्रतिऔंस 1565.36 डॉलरपर्यंत वाढला आहे. कमॉडिटी बाजारात सोने दरात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दर 0.45 टक्क्यांनी वाढला आणि तो 41,200 रुपायांवर गेला. चांदीच्या कितीत 0.53 टक्क्यांनी वाढ झाली.
 
जागतिक बाजारातील घडामोडींचे सोने दरावर परिणाम होत आहेत. इराकमधील बगदाद शहरात अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. दावोसमध्ये सुरु झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती