ऑनलाइन फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणार्या ‘Zomato’ कंपनीने ‘Uber Eats India’ या प्रतिस्पर्धी कंपनीला विकत घेतले आहे. या व्यवहारानुसार, झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे 35 कोटी डॉलर अर्थात 2485 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. बऱ्याच काळापासून याची चर्चाही सुरु होती.
कॅब सेवा पुरवणारी प्रसिद्ध कंपनी उबरचा ऑनलाईन फूड सर्व्हिसमध्ये भारतात चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे झोमॅटोमध्ये आता उबरचा केवळ 9.99 टक्के हिस्साच असणार आहे.