'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन आणणार

Webdunia
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (12:02 IST)
स्मार्टफोन कंपनी 'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करत आहे.  कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 
 
फ्लॅगशिप स्मार्टफोन 'realme x50 pro 5g' चा एक टीजर शेअर करत कंपनीने यात काही फीचर्सबाबत माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 20X हायब्रिड झूम सपोर्ट, फोटो आणि व्हिडिओ मोडमध्ये स्विचिंग सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कॅमेराबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु यात १३ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा वापर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
त्याशिवाय, Snapdragon X55 5G मोडेम, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असणार आहे.  कंपनीने ट्विटरवर या फोनच्या लॉन्च इव्हेंटबाबत एक  टीजर पोस्ट केलं आहे.  स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीही आहे. यात 65W SuperDart चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

संबंधित माहिती

पुढील लेख