एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:31 IST)
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून आगंतुकाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. त्यांना एअर होस्टेस म्हणतात. 
 
त्या फक्त स्वागतच करत नाही तर प्रवासात प्रवाशांची काळजी घेणे त्यांना चहा, नाश्ता, जेवण देणे आणि गरज पडल्यास मेडिकल देणे, प्रवासासंबंधी सूचना देणे. हे सर्व कार्य करतात. त्यांचं काम सन्माननीय असते. या पदासाठी त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. चला मग जाणून घेऊ या एअर होस्टेस बनण्यासाठी काय करावे लागतं- 
 
एअर होस्टेस कसे बनू शकतो ?
बारावी पास असणे अनिवार्य आहे.
हिंदी, इंग्रजीसह इतर भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
फिजिकल अपीयरेंस आणि कम्युनिकेशन स्किल उत्तम असणे गरजेचे आहे.
सकारात्मक विचार, कॉमन सेंस, प्रेंजेंस ऑफ माइंड असणे आवश्यक आहे.
उंची किमान 157.5 सेमी आणि डोळ्यांची रोशनी 6/6 असावी.
वय 16 ते 25 या दरम्यान.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विपरित परिस्थितीत स्वत:ला शांत ठेवणे तसेच धैर्य असण्याची गरज असते.
 
या प्रकारे करा तयारी
हल्ली अनेक इंस्टिट्यूट उघडले आहेत जे एअर होस्टेस बनण्याची ट्रेनिंग प्रदान करतात. ही ट्रेनिंग 12 महिने ते 3 वर्षापर्यंतची असू शकते. अशा इंस्टिट्यूट्समध्ये डिग्री कोर्स, 
 
डिप्लोमा कोर्स आणि सर्टिफिकेट कोर्सस उपलब्ध असतात. वेळोवेळी एअरलाईन्स एअर होस्टेससाठी आवेदन आमंत्रित करत असतात. त्यात स्क्रीन टेस्ट आणि एप्टीट्यूट टेस्ट होतात. तसेच धैर्याची परीक्षा देखील घेतली जाते. विपरित परिस्थितीत आपण कशा प्रकारे सिचुएशन हँडल करा याची परीक्षा घेतली जाते.
 
जॉब मिळवण्यासाठी लिखित परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्यूह या स्टेप्स पार पाडव्या लागतात.
 
करिअर ग्रोथ
एअर होस्टेस बनल्यानंतर सीनियर एअर होस्टेस नंतर सीनियर फ्लाईट अटेंडेट आणि 10 वर्षांनंतर ग्राउंड ड्यूटीज जसे मॅनेजमेंटचा भाग होता येतं. अनुभव वाढल्यावर पगारात देखील वाढ होते. सुरुवातीला 3 ते 4 लाख का पॅकेज मिळतो नंतर आपण 10 लाख रुपये महिना पर्यंतची सॅलरी मिळवू शकता. तसेच या फील्डमध्ये पगारासहित अनेक भत्ते मिळतात ज्यामध्ये मेडिकल, विमा, विमान प्रवासामध्ये सूट सारख्या भरपूर आकर्षक ऑफर्स मिळतात.
 
टॉप एअर होस्टेस ट्रेनिंग अकॅडमी
 
Frankfinn Institute of Air Hostess Training
Bombay Flying Club College of Aviation, Mumbai
Universal Aviation Academy, Chennai
Jet Airways Training Academy
Indigo Training Centre
Air Hostess Academy (AHA) Bangalore
Air Hostess Academy (AHA) Delhi
Indira Gandhi Institute of Aeronautics (IGIA), Nagpur

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती