अँड्रॉइड मोबाईल ला सीसीटीव्ही कॅमरा कसे बनवाल जाणून घ्या

मंगळवार, 9 मार्च 2021 (20:25 IST)
सीसीटीव्ही कॅमरा सर्वांनाच माहिती आहे. शॉप, बँक, ऑफिस आणि घराची देखरेखीसाठी हे वापरले जातात. सीसीटीव्ही कॅमरा प्रत्येक येणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बनवतो जे त्याच्या समोरून निघतात. बऱ्याच ठिकाणी कॅमेरे असे लावतात जे कोणालाही दिसत नाही.सीसीटीव्ही बऱ्याच ठिकाणी लावले जातात. आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनचा वापर देखील सीसीटीव्ही म्हणून करू शकतो .कसं काय तर मग जाणून घेऊ या. 
 
अँड्रॉइड मोबाईल फोनला सीसीटीव्ही कॅमरा कसे बनवाल.
या साठी आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असावा. अँड्रॉइड फोन मध्ये आणि लॅपटॉपमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. मोबाईल आणि लॅपटॉप एकाच इंटरनेट कनेक्शन ने जोडण्यासाठी आपण वायफाय देखील वापरू शकता. 
 
* सर्वप्रथम फोन मध्ये प्ले स्टोअर मधून IP Webcam अप इंस्टाल करा. हे फ्री आहे.
 
* या अप ला उघडा.या मध्ये बरेच पर्याय दिसतील सर्वात खाली बघा Start Server पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.क्लिक करतातच आपल्या मोबाइलला मध्ये सीसीटीव्ही कॅमरा सुरू होईल. 
 
* आता मोबाइलला स्क्रीनवर एक लिंक दिसेल ती कागदावर लिहून ठेवा. 
 
* कॉम्प्युटर मध्ये कोणतेही ब्राउझर उघडा आणि त्यामध्ये ती लिंक घाला आणि उघडा. आता आपल्या सिस्टमवर बरेच पर्याय दिसतील. त्यामध्ये Video Renderer मध्ये Flash पर्याय निवड करून त्यावर क्लिक करा. व्हिडीओ सुरू होईल. ऑडिओ ऐकण्यासाठी Audio Player पर्यायां पैकी कोणतेही एक पर्याय निवडा. 
 
आता आपल्या सिस्टम मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ दोन्ही सुरू होईल. 
 
आपण मोबाईलवर त्या अँप ला मिनिमाइझ करून दुसरे काम देखील करू शकता. कोणाला कळणार देखील नाही की रेकॉर्डिंग सुरू आहे. 
अशा प्रकारे आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोन ला सीसीटीव्ही कॅमेरा बनवू शकता. आणि त्या प्रमाणे वापरू शकता. आपण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग देखील करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती