रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने अशी स्पर्धा आयोजित केली आहे ज्यात थायलंड ट्रिप आणि विजेत्यास एक महिन्याचे विनामूल्य रिचार्ज दिले जात आहे. खरं तर, जिओ आणि स्नॅपचॅट इंक (Snapchat Inc)यांनी संयुक्तपणे ‘Jio’s Got Talent’ , वापरकर्त्यांसाठी एक क्रिएटिव चैलेंज सुरू केले आहे, ज्याची सुरुवात 26 जानेवारीपासून झाली होती. हे भारताचे पहिले 10 सेकंदाचे क्रिएटिव चैलेंज आहे. या चैलेंजच्या माध्यमातून स्नॅपचॅट वापरकर्ते मजेदार आणि क्रिएटिव पद्धतीने आपले टॅलेंट दाखवू शकतात.
Jio's Got Talent मध्ये कसे सहभागी व्हाल?
जिओ आणि स्नॅपचॅटने Snapchat Lens तयार केले आहेत. यामध्ये वापरकर्ते माइक, हॅट, हेडफोन आणि लाईट रिंग सारख्या विविध प्रकारचे प्रॉप्स निवडू शकतात.
या चैलेंजमध्ये भाग घेण्यासाठी, वापरकर्त्यांना Jio's Got Talent लेन्सचा वापर करून स्नॅपचॅटवर 10 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल, ज्यामध्ये ते त्यांची प्रतिभा दाखवतील.
यात, सर्वात मनोरंजक आणि क्रिएटिव कंटेंटला जिओकडून पुरस्कृत केले जाईल.
100 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ फ्री रिचार्ज
जिओ डॉट कॉमवर दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड प्राइज मिळविणार्याला थायलंड ट्रिपसाठी दोन तिकिट आणि 100 बेस्ट एन्ट्रीसाठी 1 महिने विनामूल्य जिओ रिचार्ज मिळतील. यात सहभागी होण्याची शेवटची तारीख आज (4 फेब्रुवारी) आहे.