ग्राहकांच्या खिशाला कात्री, मोबाइल रिचार्ज वाढण्याची शक्यता

गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (11:53 IST)
मोबाइल ग्राहकांसाठी चिंतेची बाब म्हणजे पुन्हा एकदा टॅरिफ दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅन्समध्ये दरवाढ केल्यामुळे यूजर्स आधीपासूनच परेशान आहे आणि त्यात भर म्हणजे येत्या काळात ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता आहे.
 
एक्सपर्ट्सप्रमाणे टेलिकॉम इंडस्ट्रीतील तोटा भरुन काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणे आवश्यक आहे. यामुळे प्रती यूजर 200 रुपयांपर्यंत वाढ करण्याची गरज देखील भासू शकते. तसेच ग्राहकांना गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे म्हणून फ्लोअर प्राईस निश्चित करण्याची मागणी देखील ट्रायकडे केली गेली आहे. 
 
हे सर्व बघता काही दिवसांत दरवाढ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती