फोनचे व्यसन तपासणारे अँप

बुधवार, 21 मे 2014 (14:27 IST)
सध्याच्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे मोबाइल. रोज नवनवीन स्मार्टफोन बाजारात येत आहेत. या फोनमध्ये नवीन सुविधा ग्राहकांना दिसल्या जात आहेत. तसेच फोनचा वापर अधिक वाढला आहे. सर्वत्र पाहिल्यास प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये रंगून गेलेला दिसतो. सध्या सर्वाना फोनचे व्यसन लागले आहे. त्याचे प्रमाण दाखवणारे अँप अमेरिकेतील भारतीय  दांम्पत्याने शोधून काढले आहे.

या अँपचे नाव ‘ब्रेक फ्री’ असून तो तुम्ही मोबाइलवर किती वेळ बोलत होता तसेच तुम्ही कोणकोणते अँप वापरले आदींची माहिती नोंदवणारे आहे. हे अँप तुम्हाला संख्येच्या सहाय्याने   तुमच्या व्यसनाचे प्रमाण दाखवणार आहे, अशी माहिती ‘माशेबल’ या दैनिकाने दिली आहे.

तुम्ही एखादे अँप अधिक वेळ वापरत असल्यास त्याची नोंद हे नवीन अँप घेणार आहे. हे अँप भारतीय दाम्पत्य मृगेन कपाडिया आणि त्यांची पत्नी नूपुर कपाडिया यांनी तयार केले आहे. या दाम्पत्याची ‘मोबीफोलिओ’ ही कंपनी आहे.

या अँपतर्फे फोन मॅनेजमेट टूल्स दिले जाणार आहे. त्यातून इंटरनेट बंद करणे, फोन कॉल्स रद्द करणे आदी कामे केली जातील. तसेच संबंधित व्यक्तीला स्वंचलित पध्दतीने संदेश पाठवणत येईल.

या अँपमुळे स्मार्टफोनच्या वापरावर पालकांचे नियंत्रण राहील. मुलांच्या स्मार्ट फोनवर हे अँप डाऊनलोड केल्यास पालकांना फोनचा वापर, इंटरनेट वापराचे तास, इंटरनेटवर कोणत्या बाबी पाहिल्या आदींची तपशीलवार माहिती मिळू शकेल.

वेबदुनिया वर वाचा