एलजीचा 'जी3' स्मार्टफोन 21 जुलैला भारतात अवतरणार

सोमवार, 14 जुलै 2014 (16:33 IST)
एलजी कंपनीचा बहुचर्चित 'जी3' स्मार्टफोन येत्या 21 जुलैला भारतीय गॅझेट बाजारात लॉन्च करण्‍यात येणार आहे. कंपनीतर्फे ही माहिती देण्‍यात आली. कंपनीचा अधिकृत टीजर नुकताच लॉन्च करण्‍यात आला. 
 
यापूर्वी जी3 हा फोन न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये एकाच दिवशी लॉन्च झाला होतो. 'सिंपल इज द न्यू स्मार्ट' या 'टॅगलाइन'ने हा फोन सादर केला आहे. आता हा फोन लवकरच भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑनलाइन रिटेलर 'इंफीबीम'ने एलजीच्या जी3 ची प्री-ऑर्डर सुरु केली आहे. इंफीबीमवर या फोन किंमत 46,990 रुपये आहे. 
 
फुल एचडी स्क्रीन पेक्षाही शानदार रेझोल्युशन देण्यात आले आहे. यासोबत लेजर ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे. या सोबत फ्रंट कॅमेरासोबत ऑटोमॅटिक सेल्फी फीचर देण्यात आले आहे. उल्लेखनिय म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने या फोनमध्ये 'किल स्विच' फीचर देण्यात आले आहे. तुमचा फोन एखाद्याने उघडण्याचा प्रयत्न केला तरी तो उघडणार नाही. 'किल स्विच' फीचर सुरु झाल्यानंतर फोन आपोआप बंद होइल. नंतर मात्र, हा फोन काहीच कामाचा नसेल. 16 जीबी आणि 32 जीबी मेमरी अशा दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा