Navratri 2023 Day 3 नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा विधी आणि मंत्र

Navratri 2023 Day 3 Chandraghanta Puja देवी भगवतीची पूजा करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे. दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे, नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी तिची पूजा केली जाते.
 
यामुळे चंद्रघंटा नाव पडले
देवीचे हे रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे. वाघावर स्वार झालेल्या चंद्रघंटाच्या अंगाचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे. त्यांच्या कपाळावर घंट्याच्या आकृतीचे अर्धचंद्र विराजित आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा म्हणतात. दहा भुजा असलेली देवीला प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. त्यांच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ शोभते. त्यांची मुद्रा युद्धासाठी सज्ज असते. अत्याचारी राक्षस, पिशाच्च आणि राक्षस त्यांच्या भयानक घंटासारख्या आवाजाने नेहमी थरथर कापतात. दुष्टांचे नाश करण्यास सदैव तत्पर असूनही देवीचे हे रूप पाहणारे व उपासक यांच्यासाठी सौम्यता व शांततेने भरलेले असते. म्हणूनच देवी भक्तांचे दुःख लवकर दूर करते. देवीच्या घंटाचा आवाज नेहमीच भक्तांची भूत-प्रेत बाधा यापासून रक्षण करतं. त्यांचे ध्यान करताच आश्रय घेणाऱ्याच्या रक्षणासाठी या घंटाचा आवाज येऊ लागतो.
 
साधकांमध्ये हे गुण येतात
मां चंद्रघंटाची भक्ती केल्याने शांतीचा अनुभव येतो. अशा साधकाच्या शरीरातून दिव्य प्रकाश असलेल्या अणूंचे अदृश्य विकिरण होते. ही दैवी क्रिया सामान्य डोळ्यांनी दिसत नाही, परंतु साधक आणि त्याच्या सान्निध्यात येणारे लोक ते अनुभवतात. त्यांच्या उपासनेतून मिळालेला एक मोठा गुण म्हणजे शौर्य आणि निर्भयतेसोबतच भक्तामध्ये सौम्यता आणि नम्रताही विकसित होते. त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांची आणि संपूर्ण शरीराची चमक वाढते आणि त्याचा आवाज दिव्य आणि अलौकिक गोडीने भरून जातो.
 
उपासना केल्याने हे फळ मिळतं
या देवीची आराधना केल्याने भक्तांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख आणि संपन्नता याचे वरदान प्राप्त होतं. चंद्रघंटा मातेच्या कृपेने साधकाची सर्व पापे आणि अडथळे नष्ट होतात. त्यांचे वाहन सिंह आहे, त्यामुळे त्यांचे उपासक सिंहासारखे शूर आणि निर्भय असतात.
 
कोणी करावी चंद्रघंटा देवीची आराधना
ज्यांना क्रोध येतो किंवा जी व्यक्ती लहान-लहान गोष्टींमुळे विचलित होते ज्यांची ताण घेण्याची प्रवृत्ती असते त्यांनी चंद्रघंटा देवीची भक्ती करावी.
 
पूजा विधी
देवीला शुद्ध पाणी आणि पंचामृताने स्नान घालावे. विविध प्रकारची फुले, अक्षत, कुमकुम, सिंदूर अर्पण करावे. केशर आणि दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण करा. मातेला पांढरे कमळ, लाल जास्वंदी आणि गुलाबाची माला अर्पण करा आणि प्रार्थना करताना मंत्राचा जप करा.
 
देवी स्तुती मंत्र-
"या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नमः।"
 
पिंडजप्रवरारूढा, चंडकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यं, चंद्रघंटेति विश्रुता।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती