नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि नियम, महत्व

गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (17:01 IST)
दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणते ही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे.
 
ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते. त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो. हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं.
 
हिंदू धर्मात कोणते ही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात.
 
वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी. या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो.
 
नवरात्रात अखंड दिवा का तेवतात -
आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोकं घट-स्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले आहे.
 
नवरात्रात अखंड दिवा -
नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकता.
 
नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं.
 
अखंड दिवा लावण्याची विधी -
नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपल्याला पाळावे. जेणे करून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोकं पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात. जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता. मातीच्या दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्या.
 
शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे.
अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये.
दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं नंतर लावावं.
दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवा.
हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकता.
 
अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे -
ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावा पासून बनवलेली असते. सव्वा हाताचा मापाचा हा रक्षा सूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात.
 
अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता.
 
अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या.
 
ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं.
 
अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या.
 
अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं -
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।
 
 
किंवा
 
दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति जनार्दन:
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नमोस्तुते
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते
 
शुभ करोतु कल्याणामारोग्यं सुख संपदा
दुष्ट बुद्धि विनाशाय च दीपज्योति: नमोस्तुते
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते
 
अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम -
नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं, दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं, दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाचा रूपात देखील संभवतो.
 
कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यानं त्वरित यश प्राप्ती होते.
 
* अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं.
 
* दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते.
 
* जर अखंड वात विना कारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते.
 
* दिव्यात पुन्हा -पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असे केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो.
 
* नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भराभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते.
 
* नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य -शांती आणि पितृ शांती मिळते.
 
* नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात.
 
* नवरात्रात विर्द्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा.
 
* जर आपल्याला काही वास्तू दोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
 
* शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती