आपल्या कुलदेवाता किंवा नित्य पूजेच्या देवच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची देवी करुन त्यावर शुद्धोदकानें भरेलल्या वा वारळ गोठण इत्यादि पवित्र ठिकाणीची माती आत घातलेल्या कलशाची स्थापना करुन त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्रीदेवीची मूर्ती किंवा तदभावी नारळ ठेवून पूजा वगैरे करणे याला घटस्थापना असे म्हणतात. ही पहिल्या दिवशी करुन नऊ दिवस तो घट तसाच ठेवायचा असतो.
वेदांची प्रार्थना
वेदीला हात लावून मंत्र म्हणावा-
ॐ मही द्यौ: पृथिवी च न ऽइमं यज्ञं मिमिक्षताम । पिपृतान्नो भरीमभि: ॥
पूर्णपात्र म्हणजे ताम्हणात तांदूळ भरुन ते पात्र कलशावर ठेवणे
हे ठेवताना मंत्र म्हणावा-
ॐ पूर्णादर्विपरापत सुपूर्णा पुनरापत ।
वस्नेव विक्रीणा वहाऽइषमूर्ज शतक्रतो ।।
या प्रमाणे कलश स्थापना झाल्यावर त्या कलशावर कुंकवाने अष्टदल काढावे. आणि ''श्रीवरुणाय नम: सकलपूजार्थे गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि'' असे म्हणून त्या घटाला गंध-फुल-अक्षता वहाव्या.
यानंतर त्या पूर्णपात्रामध्ये देवीची किंवा आपल्या मुख्य कुलदेवाची मूर्ती ठेवावी. तसे शक्य नसल्यास त्या कलशावर नारळ ठेवावा म्हणजे हे देवतास्थापन पूर्ण झाले.
अंकुरारोपण
घटस्थापना झाल्यावर त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरावी आणि त्या मातीत नवधान्य-भात, गहू, जोंधळे, मका, मूग, हरभरे इत्यादी परावे आणि पुन्हा माती पसरवावी. यावेळी म्हणवाचये मंत्र
हे मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडावे. अंकुर पिवळा येण्यासाठी हळदीचे पाणी करुन शिंपणे किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालून नंतर रुजत घालावे.
घटप्रार्थना
धान्य रुजत घातल्यावर घटप्रार्थना करताना म्हणावयाचे मंत्र-