Navratri 2022 Ghat Sthapna Muhurat : घटस्थापना शुभ मुहूर्त

रविवार, 25 सप्टेंबर 2022 (12:20 IST)
Navratri 2022 Ghatasthapana Kalash Sthapana Muhurat : आश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्र 26 सप्टेंबर सोमवार रोजी सुरू होत आहे. 5 ऑक्टोबर 2022 रोजी नवरात्र समाप्ती होईल. यंदा देवी आई हत्तीवर स्वार होऊन येत असून हे शुभ योगायोग आहे. नवरात्रोत्सवात शक्ती उपासनेचे विशेष महत्त्व आहे. वर्षभरात चार नवरात्रोत्सव येतात, त्यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र 9 दिवसांचे असेल आणि माता दुर्गा नऊ दिवस आपल्या भक्तांसोबत स्वर्गातून गजांवर स्वार होऊन त्यांना आशीर्वाद देतील. यावेळी शारदीय नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग तयार होत आहे. 
 
घटस्थापना शुभ मुहूर्त या प्रकारे आहे-
 
नवरात्र 26 सप्टेंबर 2022 सकाळी 03:23 पासून सुरु होत आहे. 
प्रतिपदा तिथी समाप्त :  मंगळवार, 27 सप्टेंबर 2022, पहाटे 3 वाजून 08 मिनिटे
अमृतसिद्धी मुहूर्तावर पहाटे साडे चार ते आठ वाजेपर्यंत घटस्थापना करू शकता.  
काळी 10 ते 11.30 दरम्यानही घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त आहे.
 
अष्टमीची महापूजा 2 ऑक्टोबरला, महाअष्टमी व्रत पूजा 3 ऑक्टोबरला आणि महानवमी 4 ऑक्टोबरला आहे.नवरात्रीची सांगता 5 ऑक्टोबरला होणार आहे.
 
पूजा विधी -
सकाळी उठून गरम आंघोळ करून पूजास्थळी गंगेचे पाणी टाकून शुद्ध करा.
घरातील मंदिरात दिवा लावावा.
माँ दुर्गेचा गंगाजलाने अभिषेक करा.
आईला अक्षत, सिंदूर आणि लाल फुले अर्पण करा, प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा.
धूप आणि दिवे लावून दुर्गा चालिसाचे पठण करा आणि नंतर आईची आरती करा.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती