आवाहन मी करते, यावं प्रेमभरे,
तुमच्याचं कृपेने नांदती सर्वच सौख्यभरे,
राहावं घरी, घ्यावे माहेरपण तूम्ही,
बसावं मखरांत, तृप्त व्हावं तुम्ही,
पुरवून घ्यावे लाड कोड येता माहेरी,
ल्यावी साडी चोळी नवीही भरजरी,
दागदागिने अंगावर घाला, माळा वेणी,
मुलाबाळां बरोबर तुमची ही आनंदपर्वणी.
तूच महामाया माय आहे ग आमुची,
सेवा तुमची घडो सदा गोष्ट आनंदाची,
असेल तुझाच वास घरोघरी आता ,