छत्तीसगडमध्ये जंगली हत्तींची दहशत, सात जणांना चिरडले

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (14:24 IST)
छत्तीसगड मधील जशपुर जिल्ह्यामध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसोबत चार इतर लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. अधिकारींनीं हे माहिती शनिवारी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बगीचा गावामध्ये जंगली हत्तींचा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला त्यासोबतच इतर चार जणांचा देखील मृत्यू झाला आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोसमोर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये मदत तात्काळ देण्यात आले आहे. अधिकारींनी सांगितले की, जशपुर मध्ये चार वन परिक्षेत्रमध्ये 38 हत्ती विचरण करीत आहे. ज्यामध्ये 15 हत्ती एकटे फिरत आहे. तसेच गेल्या महिन्यात हत्तींनी अनेक जणांचा जीव घेतला आहे.  

संबंधित माहिती

पुढील लेख