देशात बुधवारी अनेक राज्यांमध्ये चांगलाच पाऊस कोसळला आहे. या दरम्यान पाऊस लोकांसाठी जीवघेणा ठरला आहे. पावसामुळे आता पर्यंत युपीमध्ये 52, बिहार मध्ये 16, आसाममध्ये 92 आणि हिमाचल प्रदेश मध्ये 22 लोकांचा मृत्यू झालेला आहे. युपी मध्ये वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झालेला आहे. उत्तराखंड मध्ये चमोली मध्ये मंगळवारी दरड कोसल्यानंतर बद्रीनाथ हायवे बंद करण्यात आला आहे. मागील 24 तासांमध्ये पावसामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आज अनेक राज्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट-
हवामान खात्याने आज राज्यांमध्ये अलर्ट घोषित केला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, यूपी, एमपी, बिहार, मेघालय, सिक्किम, गुजरात, महाराष्ट्रए कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा, झारखंड, नागालँड, मणिपुर, छत्तीसगढ़, उत्तराखंड, जम्मू, आसाम आणि राजस्थान सहभागी आहे. आईएमडी ने बिहार, बंगाल, सिक्किम, मेघालयमध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. तर बाकी राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.