बायकोने रंगीत नवर्याला अद्दल घडविण्यासाठी प्रेयसी बनून भेटायला बोलवलं आणि मग धूमाकूळ घातला आणि त्याला भररस्त्यावर धूतलं. ही घटना मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्याची आहे. बायकोला अंधारात ठेवून सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडशी चॅट करणं नवर्याला चांगलंच महागात पडलं. ऑनलाइन मैत्रीणीला पहिल्यांदाचा भेटायला गेल्या नवर्याला मोठा धक्का बसला. जेव्हा समोर गर्लफ्रेंडऐवजी बायको दिसली.
पत्नीनं सांगितलं की नवरा घरात त्रास देत होता, मारहाणही करायचा आणि घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. त्याचं इतर महिलांशी बोलणे होत असल्याचे कल्पना असल्यामुळे मी ही योजना आखली. पंधरा दिवस चॅटिंग केल्यावर त्याला भेटायला बोलावलं. पतीला याबद्दल कल्पना नसल्यामुळे तो उत्साहात नव्या प्रेयसीला भेटायला पोहचला तेव्हा महिला तोंड झाकून उभी होती पण जेव्हा तिने झाकलेला चेहरा दाखवला तर पती पूर्णपणे हादरला कारण फोनवर बोलत असलेली प्रेयसी दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं.