अबकी बार आंबेडकर की सरकार असे कोण म्हणाले

मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:57 IST)
देशात आणि राज्यात निवडणुका वातावरण तापत आहेत. त्यात काँग्रेस आणि भाजपा सोडून एक मोठी आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली असून तीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी जोर पकडत आहे. त्यात एमआयएमचे नेते जोरदार प्रसार करत आहेत. ते म्हणतात की, गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणत त्यांना निवडून दिले. 2019 च्या निवडणुकीत आम्ही अबकी बार आंबेडकर सरकार असा असा नारा देत निवडून येऊ असा विश्वास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित संविधान सन्मान सभेत जलील बोलत होते. त्यामुळे आता निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तयार होणार असून जोरदारलढत होते असे चित्र आहे.. अमागील 70 वर्षांपासून तुम्ही सर्व बोलत आहात आणि आम्ही ऐकून गेतोय, मात्र आता हवा बदलत असून, आम्ही बोलणार, तुम्हाला ऐकावे लागणार आहे, असे जलील म्हणाले आहेत. 'गेल्या 70 वर्षात सर्वात जास्त फसवणूक मुस्लिम समाजाची झाली असून, तुम्ही अबकी बार मोदी सरकार म्हणाला, अबकी बार आंबेडकर सरकार आमचा नारा आहे. दलित, वंचित, मुस्लिम एकत्र आले तर 2019 ला आंबेडकरांचे सरकार येईल. मुसलमांना आणि दलितांना दुसऱ्या कोणी नाही, तर त्यांच्याच लोकांनी हरवले आहे. अनेकांनी आपल्या समाजाचा विचार न करता स्वतःचा स्वार्थ पाहिला. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करत असाल, तर आज शपथ घ्या की प्रकाश आंबेडकरांना निवडून देऊ. तुम्ही सगळे प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहिलात तर कोणी भिडे तुमच्यासमोर उभे राहू शकणार नाही, असे जलील यांनी म्हटले आहे.त्यामुळे विरोध तीव्र तर होणार त्यात निवडणुकीची स्पर्धा देखील वाढणार असे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती