तुळशीलग्न त्यानंतर साखरपुडा, जेवणात पडली पाल, झाली ४५ लोकांना विषबाधा

मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:45 IST)
नांदेड येथे अन्नातून विषबाधा झाली आहे. यामध्ये थोडी नव्हे ते  ४५ जणांना ही विषबाधा झाली आहे. त्या सर्वांवर जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरु आहेत. नांदेड येथील जवारसिंग मेरसिंग पडवळे यांच्या मुलाचा साखरपुडा सावरगाव तांडा येथे होता. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या भाजीत पाल पडली असे असून, भाजीमुळे पंगतीत जेवणाऱ्यांना विषबाधा झाली आहे पंगतीत बसणाऱ्यांना अचानक उलट्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी इस्लापूर येथील डॉक्टरांना जलधरा येथे जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.गोबल पेठोड (६०), फलुसिंग पेठोड (६०), उत्तम तगरे, गौतम पोळे (२१), बसीम अहमद (३०), मंगलसिंग पेळे (६०), दत्ता चौफळे (६०), प्रदीप तगरे (१०), बालगिव चौफाडे (५०), मलैश चौफाडे (६), गोविंदसिंग साबळे (४०), देविसिंग पेळे (६०), नारायण सांबळे (६०), रबत बालसिंग (३५), हरासिंग चौफाडे (६०), पी. भागवन सिंग (२२), मायचंद पडवळे (६०), प्रतापसिंग सांबळे (६०), लालाराम पेळे (६०), चंद्रसिंग पडवाळे (६०), सखाराम एस़ (३२), भागसिंग चौफाडे (६०), तुकाराम खसवत (६०), गणपत चौफाडे (६०), निरज खसवत (२७), न्यायसिंग पंढारे (५५), बी. एम. साबळे (५२), विष्णू साबळे (६५), माधवसिंग पोळे (३८), अमरसिंग पोळे (५०), जवासिंग पडवोळे (५५), रोहिदास पोळे (४०), हरिदास बस्सी (४०), दौलतराम बस्सी (३२), दजनसिंग खसवत (४५), सीताराम साबळे (३५), नानक चौफाडे (५३), नियालसिंग पोळे (६०), जवारसिंग चौफाडे (४७), अनिता पडवळे (१६), रघुनाथ पडवळे (७७), दशरथ चौफाडे (३५), कमलबाई चौफाडे (३८), देवसिंग चौफाडे (४०) हे सर्व उपचार घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती