मोबाईल वापरात असाल तर ही बातमी मोठी असून तुमच्या साठी आहे. आपल्या देशातील 25 कोटी मोबाईल युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली असून, टेलिकॉम कंपन्या 25 कोटी मोबाईल युजर्सचं सिम बंद करणार आहेत. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन यांचा या सिम बंदीत समावेश असणार आहे. जर तुम्ही प्रतिमहिना 35 रूपयांपेक्षा कमी रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुमचं सिम कधीही बंद होणार आहार. तर या 25 कोटी मोबाईल युजर्समध्ये सर्वाधिक 2 जी मोबाईल युजर्सचा असणार आहेत.नवीन पद्धती नुसार 35 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज करण्याऱ्यांमध्ये एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा सर्वाधिक समावेश असून, त्यात 10 कोटी इतकी आहे. उर्वरीत 15 कोटी ग्राहकांमध्ये आयडिया आणि व्होडाफोन ग्राहक आहेत. आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी 35 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिजार्च उपलब्ध करुन दिले. मात्र, त्यांना याचा मोठा फटका बसतो आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एअरटेलच्या 10 कोटी ग्राहकांनी महिन्याला 10 रुपयांचा रिचार्ज केल्यावर कंपनीच्या खात्यात 100 कोटी रुपये जमा होतात. ज्यावेळी एअरटेलचे ग्राहक 35 रुपयांचा रिचार्ज करतील. तेव्हा कंपनीच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच, या निर्णयामागचं दुसरं कारण म्हणजे, 2 जी ग्राहकांना 4 जी मध्ये स्विच करणं असणार आहे.मात्र जर यांनी ज्यांचे सीम बंद झाले त्यांनी जियो घेतले तर मग इतर कंपन्या पुन्हा अडचणीत येतील आणि जियोला फायदा होईल असे सुद्धा तज्ञाना वाटते.